प्रतिनिधी /बेळगाव
विमल फौंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फौडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी एका कार्यक्रमासाठी सिंधूताईंना बेळगावला निमंत्रित केले होते. महावीर भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात सिंधूताईंनी आपला जीवनपट उलगडला होता. यावेळी फौंडेशनच्यावतीने त्यांना निधीही देण्यात आला होता.
त्यांच्या निधनानंतर फौंडेशनने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अनाथांचा सांभाळ करणाऱया सिंधूताईंचे कार्य समाजाला प्रेरणा देत राहील, असे किरण जाधव यांनी सांगितले.
बेळगाव जिल्हा महिला परिषद
बेळगाव जिल्हा महिला परिषदेतर्फे सिंधूताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे कार्य खूप मोठे आहे, असे परिषदेच्या अध्यक्षा माधुरी नेवगिरी यांनी सांगितले. यावेळी अनुराधा सुतार, सचिव सुनीता सुभेदार, शुभांगी निकम, माधुरी पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी एसएसके विद्या मंदिरतर्फे प्रदीप काळभैरव यांनी श्रद्धांजली अर्पण केली.









