ओरोस / प्रतिनिधी-
ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या समिर गुरुनाथ चिंदरकर या गंभीर रुग्णाला Aनिगेटीव या दुर्मिळ रक्तगटाच्या प्लेटलेट्सची तातडीची गरज असल्याचे सिंधु रक्तमित्रला समजताच संस्थेचे सा.वाडी तालुका सचिव बाबली गवंडे आणी जिल्हा सहखजिनदार अमेय मडव मालवण तालुकाध्यक्ष शिल्पा खोत, सिध्देश आजगावकर यानी तातडीने हालचाल करुन नितिन परब मातोंड आणी रमाकांत नाईक कुडाळ या रक्तदात्याना तयार करुन ओरोस येथे तात्काळ रक्तदान केले. समिर चिंदरकर या पेशंटचा प्लेटलेट काउंट १८०००एवढा खाली आल्याने त्यांची तब्येत गंभीर बनली होती.सिंधु रक्तमित्रच्या आवाहनाला नितिन परब आणी रमाकांत नाईक या रक्तदात्यानी तात्काळ प्रतिसाद देवुन रक्तदान केल्याने एका गंभीर रुग्णाला जीवनदान मिळाले.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणी रुग्णाच्या नातेवाईकानी याबद्दल रक्तदात्यांचे आभार मानले.









