स्वप्निल म्हापसेकर आणि निलेश राणे यांनी केले रक्तदान
प्रतिनिधी / ओटवणे:
सावंतवाडी काॅटेज हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सांगेली येथील पूजा गडकरी या गरोदर महिलेला बी पाॅझिटीव्ह
दोन ब्लड बॅगची तात्काळ आवश्यकता असल्याचे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला समजताच या प्रतिष्ठानने त्वरीत दोन रक्तदाते उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जोपासली. ब्लड बॅगसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे आणि ओटवणे येथील जयगणेश गांवकर यांनी ओटवणे येथील स्वप्निल म्हापसेकर आणि बांदा टू व्हीलर मेकॅनिकल संघटनेचे गटप्रमुख निलेश राणे यांना संपर्क करताच त्यांनी तात्काळ सावंतवाडी रक्तपेढीत येऊन रक्तदान केले. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानसह रक्तदाते आणि बाबली गवंडे व जयगणेश गावकर यांचे गडकरी कुटुंबियांनी आभार मानले.
Previous Articleमहाबळेश्वर पर्यटकांनी बहरले
Next Article अभंग गायन स्पर्धेत कुणकेरीची समृद्धी सावंत प्रथम









