डॉ. प्रा. विनोद गायकवाड. बिल्वदल साखळीतर्फे “भुईचाफा” नवोदित मराठी साहित्य संमेलन. विविध विषयांवर परिसंवाद.
प्रतिनिधी / डिचोली
आपल्या अंगातील कला गुण तसेच साहित्य गुणांनाही उभारी देताना आपल्या मातीशी घट्ट नाते असणे ठ्फार महत्त्वाचे आहे. मातीतील ओलावा आणि ऋणानुबंध आपल्याला सदैव आपल्या भावना व्यक्त करण्याची प्रेरणा देत असते. आपल्या मनात येणारे विचार हे सदैव आपण लेखणीतून उतरवून काढले पाहिजे. तेव्हाच आपण साहित्य विश्वाकडे प्रस्थान करूत असतो. आपल्या साहित्यात सदैव समाज भावना महत्वाच्या असून मनातील भावना समाजापर्यंत पोहोचविण्याचे साहित्य हे प्रभावी माध्यम आहे. या भावना अत्यंत साध्या आणि सुटसुटीत शब्दात असल्यास त्याचा जास्त प्रभाव असतो, असे प्रतिपादन जे÷ कथा कादंबरीकार तथा जे÷ साहित्यीक डॉ. विनोद गायकवाड यां?नी साखळी येथे केले.
बिल्वदल साखळीतर्फे पं. घनश्यामबुवा शास्त्री जावडेकर सभागृहात आयोजित “भुईचाफा” नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. प्रा. विनोद गायकवाड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जे÷ साहित्यीकप्रा. कृष्णाजी कुलकर्णी, बिल्वदल साखळीचे अध्यक्ष सागर जावडेकर, उपाध्यक्ष करूण बापे, डॉ. राजेन्द साखरदांडे, म. कृ. पाटील, अनधा गुणाजी आदंची उपस्थिती होती.
गोव्याला भौगोलिक ,सांस्कृतिक इतिहास आहे त्यासाठी हे राज्य म्हणजे ईश्व आणि वरी असे ईश्वरी वरदान प्राप्त झालेले राज्य आहे. या राज्याच्या मातीत कलेचा ओलवा आहे. म्हणूनच या मातीतील कलाकारांचे मातीशी नाते आहे, असेही यावेळी डॉ. प्रा. विनोद गायकवाड यांनी म्हटले.
साहित्य हि मोजमाप करण्यासारखी निर्मिती नाही.
साहित्य हे.शब्दशिलपातून प्रकट होत असते म्हणूनच साहित्याची जोड इतर कोणत्याही माध्यमाशी करता येणार नाही. समाजाची संकल्पना ज्याप्रकारे घडत असते त्यावरून आजच्या किंवा मागील शिक्षकांनी समाजासाठी काय केले आहे याची कल्पना मिळत असते. साहित्यात सर्वात जास्त वाचनाला महत्त्व आहे. आपल्या मनात येणारे विचार हे आपण कागदावर उतरून काढण्याची क्षमत सदैव बाळगावी. ते केवळ उतरून काढले म्हणून होत नाही तर त्यावर चिंतन व्हायला हवे. चिंतनाला एक आत्मकि खोली असून प्रखर चिंतनानंतर विचारांची वाढलेली उंची यावरून साहित्यातील नवीन निर्मिती जन्म घेत असते. म्हणूनच साहित्य हे एकाच उंचीवर जाऊन स्थिरावणारे माध्यम नाही. साहित्य हि मोजमाप करण्यासारखी निर्मिती मुळीच नाही. असे प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना जे÷ साहित्यीक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यां?नी म्हटले.
नवीन पिढी हि मागील पिढीच्या खांद्यावर बसून भविष्य पाहण असते तेव्हाच त्यांना नवीन क्षितीजे दिसत असतात. म्हणूनच आज आपण या साहित्य क्षेत्रात करणारे काम पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे, या संकल्पनेने काम करावे. आज ई माध्यामाच्या नावाने चाललेला धुमाकूळ हा वेगळाच आहे. या माध्यामात दररोज नवनवीन बदल होतच असतात. एक बदल लक्षात येण्यापूर्वीच दुसला बदल झालेला असतो. अशा य युगात आपले साहित्य पुढे न्यावे हे एक आजच्या नवोदित साहित्यकांसमोर आव्हानच आहे. त्यासाठी या साहित्यकि संमेलनाचे माध्यम चांगले आहे, असेही यावेळी प्रा. कुलकर्णी यांनी म्हटलं. दिपप्रज्वलनाने संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. स्वागतपर भाषणात बिल्वदल साखळीचे अध्यक्ष सागर जावडेकर यांनी, साहित्य निर्मिती हि आजपर्यंत जे÷ आणि दिग्गज साहित्यकांनी पुढील पिढीसाठी जपून ठेवली आहे. ती याहि पुढे साहित्यात नवीन पिढीने यावे आणि नवनवीन विचार या माध्यमातून पुढे यावे, यासाठी हा एक उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. सूत्रसंचालन साईली गर्दे यांनी केले. तर अनधा गुणाजी यां?नी आभार मानले.









