नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा जबरदस्त तडाखा देश सहन करत असतानाच केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी तिसऱया लाटेपासून बचाव करण्यासाठी नवे उपाय सुचविले आहेत. देशातील जनतेने आणि सरकारने वेळीच सावधगिरी बाळगल्यास तिसऱया लाटेवर आपण विजय मिळवू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. आपण जर कठोर पावले उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. स्थानिक, राज्य तसेच जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर आपण कोरोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे सर्वकाही अवलंबून असेल, असे ते म्हणाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिसरी लाट आपण कशी रोखू शकतो, याविषयी मार्गदर्शन करणारी भूमिका राघवन यांनी मांडली आहे. दिल्लीत शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही मुद्दे स्पष्टपणे मांडले. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगतानाच काही नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकार आणि देशभरातील राज्य सरकारांसाठी ही महत्त्वाची बाब ठरली आहे. देशातील सर्व आरोग्य यंत्रणांसोबतच प्रशासकीय व्यवस्थापनाला देखील यावेळी के. राघवन यांनी सूचनावजा इशाराच दिला आहे.
तिसरी लाट येण्यापूर्वी आपण कठोर पावले उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. आपण स्थानिक, जिल्हा, राज्य आणि शहर पातळीवर कोरोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर सर्वकाही अवलंबून असेल’ असा इशारा राघवन यांनी दिला. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे सांगतानाच या नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद पेले.
राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये चार दिवसांपूर्वीही पत्रकार परिषद घेतली होती. या बैठकीत त्यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहता अनेकांचे जीव धोक्यात आहेत. पण तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे, असे ते म्हणाले होते.









