सावंतवाडी / वार्ताहर:
भारतरत्न, महान भारतीय अभियंता कै. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेला राष्ट्रीय अभियंता दिन सावंतवाडी लायन्स क्लबच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी अभियंता दादा खोर्जवेकर, उदय पारळे, महेश गोंधळेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन लायन क्लबचे अध्यक्ष परिमल नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अशोक देसाई, सचिव अमेय पई, खजिनदार प्रसाद राऊत,उपाध्यक्ष विद्याधर तावडे, गजानन नाईक, बाळ बोर्डेकर, प्रा. टकेकर, रवी सावंत, रोहित नाडकर्णी उपस्थित होते.
या वेळी अध्यक्ष ला. अँड परिमल नाईक यांनी अभियंता दिनाचे महत्व विषद करून सर्व अभियंत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सत्कार मूर्ती अभियंता श्री. दादा खोर्जवेकर, श्री. पारळे व श्री.महेश गोंधळेकर यांनी मनोगत व्यक्त केले आभार सचिव ला.अमेय पई यानी मानले.
Previous Articleपर्यटन महामंडळ कामांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
Next Article सोलापूर : पंढरपूरसह 4 तालुक्यातील संचारबंदी उठवली









