सावंतवाडी / प्रतिनिधी:
सावंतवाडी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या ऍड. परिमल नाईक यांनी एका समारंभात सूत्रे स्वीकारली. आपण वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबवून लायन्स क्लबचे नाव उज्ज्वल करू, असे त्यांनी स्पष्ट केले. मालवणचे गणेश प्रभुलकर यांनी त्याना शपथ दिली. याप्रसंगी केशव फाटक, गजानन नाईक, अमेय पई, प्रथम उपाध्यक्ष विद्याधर तावडे, दत्तू नार्वेकर, प्रसाद राऊत व पदाधिकारी उपस्थित होते
Previous Articleराणे यांच्या अटकेचा भाजपकडून भावनिक बाजार डॉ. परुळेकर यांची टीका
Next Article नाना पटोलेंचा उत्तर महाराष्ट्र दौरा पुन्हा रद्द









