सह्याद्री प्रतिष्ठान आणि सावंतवाडी बहुउद्देशीय दशावतारी संघाचा उपक्रम
ओटवणे / प्रतिनिधी:
सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी तालुका बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील जेष्ठ ८० दशावतारी कलाकारांना धान्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे सिद्धेश परब, सुनील राऊळ, इन्सुली माऊली विद्या मंदिरचे मुख्याध्यापक विनोद गावकर ओटवणे येथील ज्येष्ठ दशावतारी कलाकार नाना गावकर, सावंतवाडी तालुका बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघाचे अध्यक्ष विलास परब, उपाध्यक्ष दादा कोनसकर, सचिव संदीप कोनसकर, सल्लागार संतोष रेडकर, मुकुंद परब, तालुका कार्यकारणी सदस्य बंटी कांबळी, संदीप मालवणकर, उदय कोनसकर, नारायण आशयेकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबुराव आशयेकर, महादेव दळवी, प्रभाकर दळवी, प्रभाकर मुळीक, श्रीधर मुळीक आदी उपस्थित होते.
यावेळी सहयाद्री प्रतिष्ठानचे सिद्धेश परब आणि सुनील राऊळ यांचा सावंतवाडी तालुका बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सिद्धेश परब यांनी गड किल्ल्यांचे संवर्धन संवर्धन करण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान करत असून विविध सामाजिक उपक्रमही प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येतात. कोरोना काळात दशावतारी कलाकारांना दिलासा मिळावा याच उद्देशाने दशावतारी कलाकारांना धान्य वितरण केल्याचा प्रतिष्ठानला आनंद आहे. तसेच सह्याद्री प्रतिष्ठान कधीच सत्कार स्वीकारत नाही. मात्र कोकणची अस्मिता असलेली दशावतारी कला सातासमुद्रापलीकडे पोहोचली असून या कलेतील ज्येष्ठ दशावतारी कलाकारांच्याहस्ते आपला गौरव होतो हे आमचे भाग्य आहे.
यावेळी सावंतवाडी तालुका बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघाचे अध्यक्ष विलास परब यांनी दशावतारी कलाकार संघामार्फत सावंतवाडी तालुक्यातील दशावतारी कलाकारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून लवकरच आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुकुंद परब यांनी तर आभार संतोष रेडकर यांनी मानले