दोडामार्ग / वार्ताहर:
लॉकडाऊन काळापासून बंद असलेली सावंतवाडी – कुडासे – मोर्ले – केर अशी वस्तीची एसटी बस फेरी सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती मोर्ले गावचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे उपजिल्हा संघटक गोपाळ गवस यांनी दिली आहे.
गेल्या अडीच वर्षापासून लॉकडाऊनमुळे राज्यभरातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक गावांत जाणाऱ्या वस्तीची एसटी बस फेऱ्या सर्व बंद करण्यात आल्या होत्या. त्या आतापर्यत बंदच होत्या. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. अनेक बाजारपेठा सुरू होताना दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी ते केर अशी एसटी बस फेरी सुरू करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. या मागणीचा विचार करत गोपाळ गवस यांनी विभागीय वाहतूक अधिकारी मोहनदास खराडे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत ही एसटी बस फेरी सुरू केली आहे. ही बस फेरी सावंतवाडीवरून 4 वा. निघणार असून ती कुडासे मार्गे मोर्ले व केर येथे वस्तीला जाणार आहे. तसेच केर येथून सकाळी 6.30 वा. सावंतवाडीला जायला निघणार आहे. तरी या बसफेरीचा अनेकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. गवस यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









