उपाध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड
प्रतिनिधी / बेळगाव
173 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय बेळगाव संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी सुनीता साईनाथ मोहिते, उपाध्यक्षपदी नेताजी नारायण जाधव, मानद कार्यवाहपदी रघुनाथ भरमाजी बांडगी व सहकार्यवाहपदी ऍड आय. जी. मुचंडी यांची एकमताने निवड झाली. या निवडीचा ठराव सदस्य वाय. एम. तरळेकर यांनी मांडला. सदस्य अभय याळगी यांनी अनुमोदन दिले.
संस्थेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ सदस्य गोविंदराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 23 रोजी झालेल्या नवीन कार्यकारी मंडळ सदस्यांच्या बैठकीत उपरोक्त पदाधिकाऱयांची सन 2020-21 या एक वर्षाच्या कालावधीसाठी एकमताने निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱयांना संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱयांनी निवडीबद्दल मनोगत व्यक्त केले.









