बेळगाव /प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. तसेच यावषी अनेक गणेशोत्सव मंडळांनी दीड दिवस, पाच दिवस, व सात दिवस गणपतीची प्रति÷ापना करण्याचे ठरवले. त्यामुळे श्री व्यापारी मित्र मंडळ व श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल देव गल्ली शहापूर या मंडळाच्यावतीने अवघ्या पाच दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक चिंडक यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पाच दिवस गणपतीची प्रति÷ापना करण्याचे ठरविले. त्यानुसार दिनांक बुधवार दिनांक 26 रोजी गणपतीची मूर्ती कपिलेश्वर तलावात विसर्जन करण्यात आली.
विसर्जनावेळी सर्व कार्यकर्त्यांन सामाजिक अंतराचे पालन करून मूर्ती थेट गाडीतून तलावाकडे नेऊन विसर्जन केली . यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक चिंडक, सेपेटरी संजय झवर सुपर सेपेटरी संजय ओझा खजिनदार राहुल बंग कार्यकर्ते दिनेश शर्मा उमेश चिंडक महेश हेडा आशिष बंग रघुवीर जोशी राहित बाळेकुंद्री यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते









