प्रतिनिधी / सातारा
कोरोना या महामारीचे संकट जगावर आले आहे.या संकटाला दोन हात करण्यासाठी विज्ञानाची कास धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला वाचवण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.तसे अपेक्षित असताना त्यांच्याकडून सामूहिक दिवे लावण्याचे आवाहन केले आहे.असे आवाहन करणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणे आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस देश उभा केला आहे.अनेक विकासाच्या विज्ञानाच्या बाबी आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या आणल्या.तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदीरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी देशामध्ये अनेक वैज्ञानिक बदल केले. सध्या जगावर कोरोनच आलेलं संकट हे खूप भयानक आहे.
चीन असेल स्पेन असेल यासह इतर देश या विषाणूला हद्दपार करण्यासाठी त्यांच्या देशातले वैज्ञानिक अपार कष्ट घेत आहेत.आपल्या देशात ही आफत ओढवली आली.लॉक डाऊन केले आहे ही चांगली बाब आहे परंतु चांगले उपाय करणे बाजूला ठेवून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.5रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे लाईट बंद करून सामूहिक दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे असे आवाहन म्हणजे आणि त्याप्रमाणे कृती करणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घळण्यासारखे आहे.स्वातंत्र्यांनंतर 70 वर्षे देश अज्ञान व अंधश्रद्धेत बऱ्याच प्रमाणात अडकला होता.त्याला बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने पराकाष्ठा केली.अनेक संतांनी व विचारवंतांनी प्रथा मोडून काढून देश उभा केला.आता जग विज्ञाननिष्ठ असताना व सर्व जगाबरोबर भारत विज्ञानात बरोबरी करत असताना असे प्रकार करणे म्हणजे मागील दिवस पुढे आणणे व सामान्य लोकांना गोंधळात टाकणे, असा आरोप डॉ. सुरेश जाधव यांनी केला आहे.