प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. संध्या प्रशांत चिटणीस (वय 53, रा. सहजीवन परिसर कॉलनी, सर्किट हाऊसच्या पिछाडीस, कारंडे मळा) यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुली ऍड. सिद्धी, आर्किटेक्ट समृद्धी असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि. 25) सकाळी 9 वाजता कसबा बावडा स्मशानभूमीत आहे. जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा भक्तीसेवा विद्यापीठ सोसायटीचे विद्यमान सचिव ऍड. प्रशांत चिटणीस यांच्या त्या पत्नी होत. तसेच मातोश्री वृद्धाश्रमाच्या उपाध्यक्ष श्रीमती सूर्यप्रभा चिटणीस यांच्या स्नुषा होत.
संध्या चिटणीस यांचा सामाजिक कार्यात सहभाग होता. गोरगरीब, कष्टकरी महिलांच्या सक्षमीकरणाचे त्यांनी कार्य केले होते. भक्तीसेवा विद्यापीठ सोसायटीच्या आणि मातोश्री वृद्धाश्रमाच्या कार्यकारी मंडळावर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले होते. गेली दोन वर्षे आजाराशी सामना करत त्यांनी सामाजिक काम सुरू ठेवले होते.
Previous Articleअतिक्रमण न काढल्याच्या निषेधार्थ शनिवारी जलसमाधी आंदोलनाचा इशारा
Next Article कोल्हापूर शहरातील सराफ बाजार सोमवारी सुरू करणार









