रशिया आणि युपेनमधील युद्ध तिसऱया आठवडय़ानंतरसुद्धा सुरूच राहिल्याने जगाच्या अर्थव्यवस्थेला धक्के बसू लागले आहेत. महागाईने उच्चांक गाठल्यानंतरसुद्धा ही परिस्थिती अजून किती बिघडेल? याचा काही अंदाज व्यक्त करणे जगभरातील धुरिणांनाही मुश्कील वाटते आहे. युपेनला नमवण्यासाठी घातक शस्त्रांचा वापर रशियाकडून होण्याची शक्मयता आणि काहीही करून हे युद्ध आपण जिंकले आहे, असे घोषित होण्याची रशियाला अपेक्षा आहे. तर आपल्या राष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व राखून या परिस्थितीतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी युपेनची धडपड आहे. आता यामध्ये सर्वमान्य मार्ग निघणार कसा हा खरा प्रश्न आहे. जगाला तेल, नैसर्गिक वायूसह अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. म्हणजे वाद एकाचा आणि शिक्षा भलत्यालाच असा हा प्रकार सुरू आहे. युद्धाच्या परिस्थितीचे चटके असे सर्वांनाच जाणवत असतात. त्यामुळे केवळ भारतालाच या परिस्थितीतून जावे लागते अशातला भाग नाही. मात्र यातून नुकसान होत आहे हे मात्र निश्चित. अर्थात हल्ला करणारा रशिया आणि तो सोसणारा युपेन यांचेही यात अतोनात नुकसान झाले आहे. आज रशिया आपल्या शक्तीचा कितीही गवगवा करो, मात्र या युद्धाने त्यांचेही खूप मोठे नुकसान झाले आहे, हे नक्की. आपल्या लोकांना उसण्या राष्ट्रभक्तीच्या, पोकळ अभिमानासाठी मोठय़ा संकटात लोटणारा देशाचा नेता अशी सध्या पुतीन यांची ओळख बनली आहे. जगाच्या दृष्टीने ते खलनायक बनून पुढे आले आहेत. त्यांच्या देशातसुद्धा फार मोठय़ा जनमताला त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. मात्र तरीही त्यांच्या एकाधिकारशाहीपुढे आतापर्यंत कोणाचेच चालत नसल्याने, ते घेतात तो निर्णय योग्य, असे मानायची वेळ या देशात आली होती. आता रशियन सरकारी टीव्ही माध्यमाचे संपादक सुद्धा, तुमचं सरकारी चैनल वरून जे दाखवले जात आहे ते सगळे खोटे आणि प्रपोगंडा असल्याचे जीवावर उदार होऊन सांगू लागले आहेत. अशा बातम्या, व्हिडिओही बाहेर येत आहेत. आपल्या ताब्यात असलेल्या भूभागाला पुरते समाधानी न करता इतरांच्या भूमीवर डोळा ठेवून आपण गत इतिहासातील चुका सुधारत आहोत हे सांगणे, म्हणजे विकृतपणाचे लक्षण म्हटले पाहिजे. पण तो जगातील एक दिग्गज माणसाचा विकृतपणा असल्यामुळे त्याला इतक्मया स्पष्टपणे असे म्हणता येत नाही. नवव्या आणि दहाव्या शतकापासूनचा इतिहास सांगायचा. पण जेव्हा युपेन या शतकातील सर्वात मोठय़ा दुष्काळाला सामोरे गेला तेव्हा सोवियत युनियनची धोरणं, शीतयुद्धाचे विपरीत परिणाम, दारिद्र्य़ाच्या खाईत लोटले जाणे, साम्यवादी विचाराकडे दुर्लक्ष आणि गोर्बाचेव काळातील बदल अशा अनेक कारणांनी तीस वर्षांपूर्वी युपेन सह 14 राष्ट्रे रशियापासून दूर गेली. आता तो इतिहास उगाळून युरोपातील व्यापारावर डोळा ठेवत हा देश गिळंकृत करण्याचा प्रयत्न आणि त्याला आपल्या तथाकथित राष्ट्रहिताच्या विचाराचा थर चढवून, लोकांना काही काळ भुलवता येऊ शकते. तसे पुतीन यांनी करूनही पाहिले. पण या युद्धाच्या प्रत्यक्ष परिणामांचे चटके जेव्हा जाणवायला लागले तेव्हा या कथित राष्ट्रवादामागील बेजबाबदार कृती उघडी पडली आहे. लोकांना यातून रशियाचे होणारे नुकसान दिसत आहे. आपल्या शेजारचे एक राष्ट्र उध्वस्त करून त्याच्यावर विजय मिळवण्याचा आनंद पुतीन यांना उपभोगायचा आहे. 2014 साली गिळंकृत केलेला युपेनचा भूभाग आणि आता ताब्यात येईल तो भूभाग आपल्या देशाला जोडायचा किंवा संपूर्ण युपेन आपल्या पंजाखाली ठेवायचा ही पुतिन यांची महत्त्वाकांक्षा जगाला विनाशाकडे घेऊन चालली आहे. अमेरिकेने आता पुतिन यांना युद्धाचे गुन्हेगार असल्याचे जाहीर केले आहे. युपेनला मोठय़ा प्रमाणावर शस्त्रे पाठवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की, रशियाला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा विजय जाहीर करायचा आहे. त्याशिवाय त्यांची या परिस्थितीतून सुटका होऊ शकत नाही. त्यामुळे रासायनिक किंवा जैविक अस्त्राचा वापर रशियाकडून केला जाण्याची भीती जगभरातून व्यक्त केली जात आहे. रशियाने युपेनमध्ये तसे काही केले तर त्याचे घातक परिणाम होतील असा इशारा अमेरिकेने दिला असून रशियावर आणखी निर्बंध लावले जाण्याची शक्मयता आहे. युपेनवर नो फ्लाईंग झोन जाहीर करावा अशी झेलेन्स्की यांची मागणी आहे. त्यांनी रशिया दहशतवादी राष्ट्र झाल्याचे जगाने अधिकृतरित्या म्हणावे अशी मागणी केली असून आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. या युद्धाचा शेवट नेमका होणार कसा? याची जगाला चिंता लागलेली आहे. दोन राष्ट्रांच्या वादात संपूर्ण जग होरपळून निघू नये, झाले तेवढे पुरे झाले अशी सर्वांचीच भूमिका दिसते आहे. मात्र यासाठी सामंजस्य घडणार कसे? हा कळीचा मुद्दा आहे आणि त्या पर्यंत अद्यापही कोणती चर्चा पोहोचल्याचे दिसून येत नाही. परिणामी हल्ले सुरूच आहेत आणि अमेरिका इशाऱयावर इशारे देत चालली आहे. त्यांच्या इशाऱयानाही अंत नाही! अशी स्थिती आहे. कोणीही कोणाचा विजय, पराजय मान्य करण्याच्या मनस्थितीत नाही आणि कोणत्याही भूभागावर पाणी सोडण्याची युपेनची तयारी नाही. आक्रमकांना शरण जायचे नाही अशी त्यांची भूमिका आहे. आता रशियाला घेरण्यासाठी चीन आणि अमेरिका यांच्यात बोलणी सुरू आहे. मात्र त्याचे परिणाम काय होतील हे जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत याचे चटके जगाला सोसावे लागणार आहेत. अविवेकी राष्ट्रहिताच्या बाता एखाद्या राष्ट्राला कसे अडचणीत आणतात त्याचे हे एक उदाहरण आहे. युपेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाची सुरू असलेली धडपड लक्षात घेतली आणि अमेरिकेची गोची अनुभवली तर युपेनला स्वतःलाच काही मार्ग काढावा लागणार आहे. सामंजस्याचा मार्ग हा जगाने सांगितल्यापेक्षा स्वतः स्वीकारल्यावर अधिक चांगले फळ देऊ शकतो.
Previous Articleयोगी आदित्यनाथांचा 25 रोजी शपथविधी
Next Article गुण हे पूजनीय असतात, लहान असोत वा मोठे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








