नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील काही कंपन्यांनी साबण आणि डिटर्जंटच्या दरांमध्ये वाढ केली आहे. वाढ करणाऱया कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा समावेश आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला असे या कंपन्यांनी स्पष्ट केले असून दरात 3 ते 4 टक्के वाढ करण्यात आली आहे.
कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हील डिटर्जंटच्या पावडरच्या दरात 3.4 टक्के वाढ झाली आहे. रिन डिटर्जंट बार आणि लक्स साबणाच्या दरातही वाढ करण्यात आली. आयटीसी कंपनीनेही आपल्या उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ केली. साबण व डिटर्जंटसाठी इंधन आणि पाम तेल हा कच्चा माल लागतो. त्यांच्या दरात वाढ झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
आयटीसीने आपल्या त्वचारक्षण आणि लाँड्री उत्पादनांचे दरात काही प्रमाणात वाढ केली आहे. गेल्या एक वर्षातील ही दुसरी वाढ आहे.









