प्रतिनिधी / टोप
टाेप येथील महाडीक काॅलनीतील कुमारी सानिया विजय पाटील हि पेठवडगांव येथील बळवंतराव यादव विद्यालय पेठवडगाव हि दहावीच्या वगात शिकते हिने नाविन्यपूर्ण अशी वैज्ञानिकाची माहिती घेऊन त्याची एकत्रित पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तकाचे अनावरण आमदार राजुबाबा आवळे शिक्षणआधिकारी किरण लाेहार शाहु शिक्षण प्रसारकमंडळाच्या अध्य़क्षा साै.विद्याताई पाेळ यांच्या हस्ते पेठवडगांव येथे करण्यात आले.
सानिया विजय पाटील हिने विज्ञानाची आवड असल्याने तिने वृतपत्र व इंटरनेटच्या माध्यमातुन डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, विजय भटकर, जगदिश बाेस, विक्रम साराभाई सी. व्हि. रमन, श्रीनिवास रामानुजन, डॉ. होमी जहांगीर भाभा, महर्षी आर्यचाणक्य, महर्षी भास्कराचार्य, महर्षी आर्यभट्ट, महर्षी नागार्जुन, असे थाेडक्यात आणि महत्वाचे त्यानी लावलेल्या शाेध ते कशाप्रकारे लावले व याची सविस्तर माहिती तयार करून त्याची २५ पानाची पुस्तिका तयार केली आहे. ती शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त आहे. तिने केलेल्या उपक्रमाचे शिक्षण आधिकारी किरण लाेहार यांनी काैतुक केले.
सानिया पाटील हिच्या पुस्तिकेचे अनावर जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी करण्यात आले. तसेच मार्गदर्शिका साै.एम.डी.बुवा यांचाही सत्कार करण्यात आला.