प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहर व जिल्हय़ात दररोज शेकडो कोरोना रूग्णांची भर पडत आहे. यावषीच्या बकरी ईदवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी घरीच राहून बकरी ईद साजरा करावा लागणार आहे. गळाभेट तसेच हातामध्ये हात घेवून ईदच्या शुभेच्छा देता येणार नाहीत.
पवित्र रमजान महिन्यानंतर मुस्लिम बांधव बकरी ईद साजरा करतात. शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी शहर व पसिरात बकरी ईद साजरी केली जाणार आहे. यावषी रमजान प्रमाणेच बकरी ईदवरही कोरोनाचे सावट आहे. सामुहिकरीत्या मोठय़ा प्रमाणात यावर्षी नमाज पठण करण्यास परवानगी प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने यावषी घरी नमाज पठण करून बकरी ईद साजरी करावी लागणार आहे.
फोनवरून शुभेच्छा देण्याचे आवाहन
बकरी ईदसाठी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घेणे गरजेचे आहे. एकमेकांना शुभेच्छा द्यायच्याच असतील तर फोनकरून शुभेच्छा द्यायच्या आहेत असे आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी केले आहे.
कारी जाकीर हुसेन
(मौलाना- मोहम्मदिया मशिद, पोलिस क्वार्टर्स)
यावषीच्या बकरी ईदवर कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मशिदमध्ये 50 लोकांना नमाज पठणाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी 6 फूटांचे अंतर ठेवून मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच नमाज नंतर इतर कोणच्याही घरी शुभेच्छा देण्यासाठी न जाता घरी जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.









