अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 30 मे 2021, स.11.00
● वाढीचा रतीब कायम : 1,990 बाधित ● आकड्यांचा घोळ सुटेना ● जिल्ह्यात मुंबईच्या दुप्पट आकडा ● पुण्यापेक्षा केवळ 103 ने कमी ● राज्यात दुसरा नंबर कायम ● उद्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस ● कोरोनामुक्तांची संख्या दिलासा देतेय ● लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता ● लॉकडाऊनचा भार पोलिसांवर
सातारा / प्रतिनिधी :
शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सातारा जिल्ह्यातील चिंताजनक परिस्थिती पाहून रात्री उशिरा येऊन आढावा घेतला. हा आढावा घेताना अजित दादा पवार यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला चांगलेच खडसावले. लोकप्रतिनिधींना झाकत प्रशासनावर ताशेरे ओढले तरी परिस्थिती बदललेली नाही. गेल्या महिन्यापासून सुरु असलेला दोन हजारांच्या संख्येने बाधित वाढीचा रतीब सुरूच आहे. शनिवारी रात्रीच्या अहवालात देखील दोन हजाराला फक्त दहा कमी 1990 एवढ्या संख्येने बाधित समोर आलेलेच आहेत. याच स्थितीत उद्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. स्थिती मात्र दोन हजारांवर स्थिर आहे.
पुण्यापेक्षा केवळ 103 ने कमी
शनिवारी रात्री अहवालात आलेली आकडेवारी फक्त पुण्यापेक्षा 103 ने कमी आहे म्हणजे सातारा जिल्ह्याची स्थिती किती चिंताजनक आहे हे यावरून कळून येते. 1,990 बाधितांचा आकडा मुंबईपेक्षा दुप्पट संख्येने आहे. निगेटिव्ह अहवालांचा पेंडिंग डाटा भरण्यात आल्याने असे घडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. एप्रिलमध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 37 टक्के एवढा होता. त्यानंतर तो मे महिन्यात 34 टक्केवर आलेला आहे. सध्या तो 27 टक्के असून पॉझिटिव्हिटी रेट खाली घसरत असला तरी बाधित वाढ कायम आहे. यामध्ये कोरोना मुक्तीचा वाढता रेट मात्र दिलासादायक आहे हे निश्चितच.
फलटण तालुक्यात कोरोनाचा कहर
दुसऱ्याला लाटेत सातारा, कराड, नंतर खटाव माण कोरेगावसह फलटण तालुके हॉटस्पॉट ठरलेले आहेत. यामध्ये गत आठवड्यापासून फलटण तालुक्यात ज्या पद्धतीने रुग्ण वाढीचे आकडे समोर येत आहेत ते चिंताजनक आहेत. तिथल्या आकडेवारी बाबत नागरिकांकडून तक्रार येत आहेत याचीही दखल प्रशासनाने घेतली पाहिजे नेमके काय हे समोर आले पाहिजे . ग्रामीण भागासह शहरी भागात ज्या संसर्ग साखळ्या निर्माण झालेले आहेत ते त्या तोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या समवेत झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याच काळात संसर्ग वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे.
लॉकडाऊनचा भार पोलिसांवर
कडक लॉकडाउन करण्याचे आदेश दिल्याने गत पाच दिवसापासून पोलीस दलाची धावपळ सुरू आहे लोक डॉन यशस्वी झाला पाहिजे यासाठी गृहराज्यमंत्री त्यांना धडक कारवाई करण्याचे आदेश देतात. मात्र दुसरीकडे रस्त्यावर असंख्य नागरिकांना तोंड देता देता पोलीस दलाची दमछाक होत आहे. मग उगीच बोलत बसण्यापेक्षा संचारबंदी आदेश मोडणार यांकडून दंड वसुली करणे असा प्रकार सुरू आहे. यामध्ये अनेक नागरिक रस्त्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी देखील हुज्जत घालत असतात. त्यात सुशिक्षित आहेत आणि अशिक्षित आहेत. जिल्हाभरात हीच स्थिती आहे. मात्र लॉकडाउन यशस्वी करण्याची जबाबदारी फक्त पोलीस दलाची नाही तर ती सर्व जिल्हावासियांची आहे याचे भान ठेवून नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवायला हवी असं मत व्यक्त होत आहे.
शनिवारी अहवालात 1990 बाधित
शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 1,990 जणांचा अहवाल बाधित आलेला असून यामध्ये 12, 400 जणांची टेस्ट करण्यात आली असून पैकी 1,990 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. गेले दोन दिवस मृत्यूचा आकडा 30 वर स्थिर राहिलेला आहे. मात्र तो थांबलेला नाही. या एकूण परिस्थितीत जिल्ह्याला दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शनिवारी बाधित…..2,257, मुक्त….2,398, मृत….24
शनिवारपर्यंत एकूण नमुने…7,61,815, एकूण बाधित….1,62,734, घरी सोडण्यात आलेले…1,37,441, मृत्यू….3,616, उपचारार्थ रुग्ण….21,651









