सातारा / प्रतिनिधी :
कर्नाटकातील कारदगा येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मनोरमा संजय कुलकर्णी (इयत्ता 9 वी – पोदार इंटरनॅशनल स्कुल, सातारा) हिने 3 रा क्रमांक पटकावला.
मनोरमाने तिच्यापेक्षा जास्त इलो रेटिंग असलेल्या दोन खेळाडूंना पराभूत करून आणि एकूण चार गुण आठ फेऱ्यांमध्ये मिळवून हे यश प्राप्त केले. यासाठी तिला साताऱ्याचे आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धीबळ खेळाडू आणि अनुभवी बुद्धीबळ प्रशिक्षक प्रणव टंगसाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे आणि एशियन प्लेयर श्रेया हिप्परगीसह 67 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. क्रीडा स्पर्धा शासनाच्या कोविड-19 नियमांचे पालन करून पार पडल्या. त्यासाठी निपाणी उत्कर्ष फौंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले.









