सातारा / प्रतिनिधी :
सातारा येथे राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते वाहतूक शाखा येथे पोलीस उन्नत दिन सप्ताहाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना देसाई म्हणाले, महाराष्ट्र पोलीस हा देशातील सर्वात कर्तृत्ववान पोलीस म्हणून ओळखला जातो. फक्त ड्युटीवर असतानाच न्हवे तर ऑफ ड्युटी सुद्धा त्यांनी केलेले कार्य विशेषतः कोरोना काळात केलेले कार्य मोलाचे आहे. मी या खात्याचा मंत्री आणि कुटुंब प्रमुख म्हणून सर्व पोलीस बांधवांना पोलीस उन्नत दिनाचा शुभेच्छा देतो आणि पुढील काळात पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही दिली.









