प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. रोज शंभरावर बाधितांचे आकडे येत असून मृत्यूही वाढत चालले आहेत. बुधवारी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 12 जुलै ते 12 ऑगस्ट हा एका महिन्याचा कालावधी मृत्यूदर वाढवणारा असून अगोदरच्या तीन महिन्यात केवळ 65 मृत्यू असताना या एका महिन्यात 132 बळी गेले आहेत. त्यामुळे जिल्हय़ाची चिंता वाढली आहे. बुधवारी जिल्हय़ातील 87 नागरिकांना डिस्चार्ज आला असून 624 जणांचे नमुने तपासणीला पाठवले आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोना टेस्टिंग लॅब सुरु झाली असून त्यात करण्यात आलेल्या चाचणीत 25 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या अहवालात … इतके बाधित आले आहेत.
साताऱयातील चाचणीचा जलद रिपोर्ट
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या घोषणेनुसार साताऱयात क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रूग्णालयात कोरोना चाचणी लॅब सुरू करण्यात आली. बुधवारी या लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचणीचे पहिले रिपोर्ट प्राप्त झाले. त्यात 25 जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.
बाधित रूग्णांमध्ये फलटण तालुकयातील सोनवडी खुर्द येथील 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 12, 8 वर्षीय बालक, शिंदेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, नांदळ येथील 23, 47 वर्षीय महिला, दत्तनगर येथील 32 वर्षीय महिला, सासवड येथील 60 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 64 वर्षीय पुरुष, कोऱहाळे येथील 49 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील 30 वर्षीय पुरुष,
खटाव तालुक्यातील पळशी येथील 55 वर्षीय पुरुष, 28, 49, 75 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालिका, वडुज येथील 15, 3 वर्षीय बालक, 67 वर्षीय पुरुष, 57, 36 वर्षीय महिला, पुसेगाव येथील 40 वर्षीय पुरुष, वाकेश्वर येथील 65 वर्षीय महिला यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
महिनाभरात कोरोनाचा कहर वाढला
12 जुलै ते 12 ऑगस्ट या एका महिन्यात कोरोनाचा कहर चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. 12 जुलैला बाधित 1671, मुक्त 1010 तर मृत्यू 65 अशी जिल्हय़ाची आकडेवारी होती. ती 12 ऑगस्टला 6225, मुक्त 2893 तर मृत्यू 197 अशी झाली आहे. या एका महिन्यात कराड तालुक्यात वेगाने रूग्णसंख्या वाढली असून त्या पाठोपाठ सातारा तालुक्यात रूग्ण वाढले आहेत. सुमारे 4554 रूग्ण एका महिन्यात वाढले आहेत. त्यातच मृत्यूही वाढले आहेत. एका महिन्यात 132 बळी गेले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार 1 ते 40 वयोगटातील बाधितांना फारसा धोका झालेला नाही. मात्र 40 ते 100 या वयोगटातील बाधित व्यक्तींचा मृत्यू जास्त प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत जिल्हय़ाचा मृत्यदर 3.1 टक्के आहे.
पाच जणांचा मृत्यू
कोरोना महामारीने रोज होणाऱया मृत्यूंनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे अंधारवाडी (ता. कराड) येथील 55 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये विठ्ठलनगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 84 वर्षीय महिला व वाजेगाव (ता. पाटण) येथील 72 वर्षीय महिला तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे शनिवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय पुरुषाचा असे एकुण 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील सोनवणे यांनी दिली.
87 नागरिकांना डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना तसेच सातारा शहरातील खाजगी रुग्णालयांतून 25 जणांना असे एकुण 87 जणांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 4, कराड तालुक्यातील 14, खंडाळा तालुक्यातील 5, कोरेगाव तालुक्यातील 1, खटाव तालुकयातील 5, महाबळेश्वर तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 8, पाटण येथील 1, सातारा येथील 16 व वाई तालुक्यातील 7 असे एकुण 62 नागरिकांचा समावेश आहे. तसेच सातारा शहरातील खाजगी रुग्णालयांतून 25 जणांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले.
624 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 36, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 12, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 28, कोरेगाव 45, वाई येथील 100, शिरवळ येथील 83, रायगाव 23, पानमळेवाडी येथील 35, मायणी येथील 38, महाबळेश्वर येथील 65, पाटण येथील 25, खावली 81, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 53 असे एकुण 624 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.








