प्रतिनिधी / सातारा :
विना परवाना पिकअप टेम्पोमधून म्हैशीची वाहतूक केल्याप्रकरणी साताऱयातील सदरबाजारच्या दोघांवर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ मन्सुर कुरेशी (वय 38), मोईन मुनाफ कुरेशी(वय 21, रा. सदरबाजार) अशी त्यांची नावे आहेत. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
वाठार पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस नाईक अतुल कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तौसिफ व मोईन हे दोघे पिकअप क्रमांक एमएच 11 टी 7066 व एमएच 11 एफ 5673 मध्ये म्हैशींची लहान रेडके निर्दयीपणाने दाटीवाटीने घेवून जात होते. त्यातील काही रेडके ही विकलांग झाली असून या गाडया दि. 10 रोजी दुपारी अडीच वाजणच्या सुमारास वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात आढळून आल्याने त्या दोघांच्यावर प्राण्यांचा छळ अधिनियम 1960चे कलम 11(1) अ, ड, ई, आयपीसी 429 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक गहिण हे तपास करत आहेत.









