प्रतिनिधी / सातारा
माण तालुक्यातील हिंगणी व बिदाल येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आल्यामुळे 10 कि.मी. त्रिज्येतील परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले होते. हिंगणी व बिदाल येथील मृत पक्षांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे यापुर्वी लागू केलेला सतर्क क्षेत्र आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी रद्द करुन मनाई व बंदी आदेश उठविला आहे.