प्रतिनिधी/ सातारा
ठाणे येथील सई पाटील या दहा वर्षाच्या मुलीने कश्मीर ते कन्याकुमारी असा 3639 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला. या प्रवासादरम्यान ती साताऱयात आल्यानंतर सातारा सायकल क्लबच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, सई आठ वर्षाची होती तेव्हा तिने लोणावळा ते बाळकुम असा 120 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला होता. ती जलतरणपटुही आहे. आहे. सप्टेबरमध्ये लडाखला सायकलवरून प्रवास केला. 38 दिवसात सईने कश्मीर ते कन्याकुमारी हा 3 हजार 639 किलोमीटरचा प्रवास केला. खासदार उदयनराजे भोसले यांनीही सईचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सातारा सायकल क्लबचे सदस्य संतोष शेडगे म्हणाले, सातारा सायकल क्लब तर्फे सईचे स्वागत आणि तिने केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल तिचा सत्कार केलेला आहे. तिने अवघ्या दहा वर्षाच्या वयात केलेले हे रॅकार्ड आहे. हे अत्यंत प्रेरणादायी आहे. क्लबतर्फे खेळाडुंचा सत्कार करण्यामागचा प्रमुख हेतू म्हणजे त्यांचा उत्साह वाढावा हाच असतो. यामुळे तो खेळाडु आणखी जिद्दीने प्रयत्न करतो. साताऱयातून प्रत्येक खेळाडु वृत्ती जपण्याची परपंरा आहे. ही परंपरा कायम ठेवत असे सत्कार करून त्यांना योग्य ती मदत क्लबच्या वतीने करण्यात येते.









