सातारा : कृषी कायद्यांविरोधात मागील 2 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभरात वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम समाज एकत्रितरित्या आंदोलन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी आणि सातारा मुस्लिम समाज यांनी ठिय्या आंदोलन केले.
या वेळी केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, तसेच एमएसपीसाठी कायदा करावा, अशी मागणी करत जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात आले.









