वाठार किरोली / प्रतिनिधी :
प्राथमिक शिक्षक बँकेमार्फत सेवानिवृत्त शिक्षक सभासदांना दिली जाणारी वैद्यकीय मदत दिलासा दायक असल्याचे शिक्षक बँकेचे माजी संचालक जनार्दन माने यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षक बँकेमार्फत रहिमतपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक सभासद जगन्नाथ मारुमळे, सुनंदा मारुमळे यांना जगन्नाथ भोसले व जनार्दन माने यांच्या हस्ते वैद्यकीय मदत देण्यात आली.
यावेळी शिक्षक बँकेचे रहिमतपूर मतदार संघाचे संचालक श्री मोहनराव निकम यांनी बँकेमार्फत वैद्यकीय मदतीमध्ये कोरोना आजाराचा नव्याने समावेश केला असून, होम क्वारंटाईन सभासदांना प्रत्येकी 5 हजार व खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांना 20 हजार पर्यंत मदत देण्यात येत आहे, तरी संबंधित सभासदांनी मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य रुपेश जाधव ,शिक्षक बँकेचे जेष्ठ सभासद प्रल्हाद माने, अरुण साळुंखे , प्रविण घाडगे, विलास वाघ, दादा थोरात, राजेंद्र देशमाने, अनिल शेडगे, प्रविण गायकवाड, विनोद बुधावले,दीपक माने, सचिन कुंभार,शिक्षक बँकेच्या रहिमतपूर शाखेचे शाखा प्रमुख राजू माने,जयवंत माने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अभिजित राक्षे यांनी केले. तर सुनंदा मारुमळे यांनी आभार मानले.









