प्रतिनिधी / वाई
वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील हे आज करोना बाधित झाल्याचे आढळून आले. त्यांना साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मार्च महिन्यापासून करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करत आमदार पाटील प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी सतत मतदारसंघात संपर्क दौऱ्यात होते.
मार्च महिन्यात करोना प्रादुर्भाव वाढू लागला व सातारा जिल्ह्यात पहीला खंडाळा येथील बाधीत रुग्ण आढळून आला.यानंतर मुंबई व परराज्यातून अलेल्यांमुळे मतदार संघात बाधीत रुग्ण आढळून आले.मतदार संघात करोना संसर्गा बाबत प्रशासनाला सोबत घेऊन जनजागृती करत संसर्ग वाढू नये यासाठी त्यांनी लोकांना सतर्क केले.गावोगावी स्वतंत्र विलीगीकरण कक्ष उभारले.सुरवातीला झालेल्या टाळेबंदीत सतरा हजार गरजू गरीबांना त्यांनी धान्याचे किट उपलब्ध करून दिले.मतदार संघात सतत संपर्क ठेवत रुग्ण संख्या वाढू लागताच वाई, पाचगणी,महाबळेश्वर,खंडाळा,शिरवळ,लोणंद येथे करोना काळजी केंद्र,विलीगीकरण कक्ष उभारले.सातारा जिल्ह्यात सर्वात चांगली व्यवस्था त्यांनी प्रशासनाला सोबत घेऊन उभी केली.वातावरणातील बदलामुळे रुग्ण वाढू लागताच मतदार संघात पाचशे इंजेक्शन बँक उपलब्ध करण्याचा संकल्प करत त्यासाठी ते झटत आहेत.
मतदार संघातील सुविधांचा आढावा,तपासण्याची माहिती,नव्याने व्यवस्था उभारणी,मतदार संघातील सरकारी डॉक्टरांबरोबर खाजगी डॉक्टरांना सेवेत सहयोग देण्याचे आवाहन करत सहभागी करून घेण्यासाठी ते सतत झगडत आहेत.या काळात त्यांनी अनेक जेष्ठ नागरिकांची काळजी व उपचार उपलब्ध करून दिले.करोना काळात सर्वसाधारण आजारावरही जनतेला सर्व उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत.आमदार मकरंद पाटील करोना बाधीत झाल्याचे समजताच मतदार संघासह जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्ते,समर्थक व मित्र मंडळींना एकच धक्का बसला.त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









