प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात फुटपाथवर दररोज भाजी विक्री करणारे बसलेले दिसतात. त्यामुळे सर्वसामान्य सातारकर पायी चालण्यासाठी फुटपाथ मिळत नाही. सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने यावर तोडगा म्हणून जेथे व्यवसायिक रस्त्यावर दिसतात तेथे अगोदर पथक माईकवरून पुकारून दुकानदारांना सूचना देते त्यामुळे वादविवादाचे प्रकार टळत आहेत. तसेच अतिक्रमण हटावची गाडी ही सतत फिरत असते, अशी माहिती पालिकेतून देण्यात आली आहे.