सोनगांवतर्फ सातारा येथे ऑक्सिजन सेंटरचे उद्घाटन
प्रतिनिधी / सातारा
कोरोनामुळे यावर्षी यात्रा करता आली नाही.मात्र, यात्रेच्या वर्गणीचा सदुपयोग करत ऑक्सिजन मशीन गावाने खरेदी केली. सोनगांव तर्फ सातारा येथील कै. शिवराम मारूती जाधव व्यापारी संकुलातील बचत गटाचे कार्यालयात इमर्जनशी ऑक्सिजन सेंटरचे उदघाटन आरोग्य केंद्र, कुमठेच्या श्रीमती फाळके यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भैरवनाथ यात्रा कमिटीचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तलाठी, आशा ताई, कोरोना कमिटीचे सदस्य उपस्थित होते. कोरोनामुळे यात्रा उत्सव साजरा करता आला नाही. परंतु त्याच यात्रेच्या वर्गणीतुन लोकांसाठीच कोरोना काळात अत्यावस्थ लोकांना दवाखान्यात बेड मिळेपर्यंत या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन मशिन मधुन खुप मोठा आधार मिळणार आहे. ऐंशी हजार रुपयाच्या दोन ऑक्सिजन मशिन आणि तीन ऑक्सिमिटर एक थर्मामीटर गण अशा प्रकारच्या साहित्या समवेत कोरोना कमिटीला लढाईला बळ मिळाले आहे. गेले पाच महिन्यांपासून सोनगांव तर्फ सातारा येथे सातत्याने कोरोना कमिटीच्या प्रयत्नांमुळे कोरोना गावाबाहेर रोकन्यास यश मिळाले होते. परंतु चालू महिन्याच्या सुरुवातीपासून सोनगांवमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असुन आता पर्यंत एकूण चौदा बाधितांपैकी तीन निगेटिव्ह एक मृत आणि दहा अॅक्टिव पेशंट आहेत. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी कमिटी बरोबर गावातील सर्व ग्रामस्थ तयारीत आहेत.