गावातल्या भिंती रंगवल्या गणितांच्या सूत्रांनी अन पाढ्यांनी, उपक्रमशील शिक्षकाची संकल्पना, कोरोना काळात मुलांना पाढे लक्षात यावेत हा हेतू
सातारा / प्रतिनिधी
वाई तालुक्यातील मांढरदेव या गावाला महत्व आहे ते काळूबाई देवीमुळे. मात्र अलीकडे या गावची ओळख धावपट्टू जनाबाई हिरवे हिचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.आता कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना ऑन लाईन शिक्षण प्रत्येकाला देता येणे शक्य नसल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील शिक्षकांनी गावातल्या भिंतीच गणिताच्या केल्या आहेत.त्यामुळे नव्याने हे गाव गणिताचे गाव म्हणून ओळख सुरू झाली आहे.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना गणितातील पाढे, बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार, क्षेत्रफळ याचा विसर पडू नये डोळ्यासमोर सतत दिसावेत यासाठी मांढरदेव येथील हायस्कूलचे शिक्षक कोचळे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गावातील भिंती गणिती सूत्रांनी रंगवल्या आहेत.अगदी मंदिराच्या भिंती रंगवल्या आहेत.यामुळे आता नव्याने मांढरदेवची ओळख गणिताचे गाव म्हणून होऊ लागली आहे.या उपक्रमाबाबत वाईचे गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी कौतुक केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









