प्रतिनिधी / सातारा
ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱयांनी महिलांच्या तक्रारी प्राप्त करून त्या तक्रारींचे निराकरण वेळेत करावे. अशा सूचना सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱयांना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे दिल्या आहेत. अशी महिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मोठया प्रमाणावर नागरिकांनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ग्रामपातळीवर घेण्यात येणाऱया आयोजनास प्रतिबंध करण्यात आला आहे. ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील महिलांना त्यांच्या तक्रारी, अडचणी मांडणे शक्य व्हावे यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे व्हॉटसऍप मोबाईल क्रमांक, फोन नंबर गावातील महिलांना उपलब्ध करून द्यावेत. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीचा ईमेल आयडी महिलांना महितीसाठी प्रसिद्ध करावा. ग्रामपंचायत स्तरावर महिला तक्रार निवारण नोंदवही ठेवण्यात यावी. तसेच या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात यावे.
पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱयांनी ग्रामीण भागातील महिलांनी तक्रारी, अडचणीबाबत आवाहन करावे. जिल्हास्तरावर जिह्यातील ग्रामीण भागातील महिलांना थेट जिल्हास्तरावर तक्रार, अडचण मांडता यावी यासाठी जिल्हास्तरावरील महिला प्लॅटफॉर्म झेडपी सातारा या वेबसाईटवर तक्रारी अडचणी पाठवाव्यात तसेच जिल्हास्तरावरून गुगल फॉर्ममध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. गटविकास अधिकाऱयांनी तक्रारी संबंधित ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून द्याव्यात. ग्रामपंचायत विभागाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









