प्रतिनिधी/सातारा
सध्या सातारा शहर परिसरात कोरोनाने थैमान घातलेले असल्याने लॉकडाऊन कडक करण्यात आलेला आहे. बुधवारी शहर परिसरासह राष्ट्रीय महामार्गावर त्यामुळे वर्दळ कमी झालेली असतानाच सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वाटेफाटÎानजिक हॉटेल मानसजवळ महामार्गावरच कोल्हापूरकडे निघालेल्या ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याने खळबळ उडाली होती. मात्र, तांत्रिक कारण दूर करुन गळती थांबवल्यानंतर दोन तासांनी टँकर कोल्हापूरकडे रवाना झाल्याने पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला.
बुधवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास साताऱयानजिक राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पेण येथून आला होता व कोल्हापूरकडे निघाला होता. मात्र या ऑक्सिजन घेवून निघालेल्या टँकरमधून गळती सुरु होती. ही बाब इतर वाहनधारकांनी टँकर चालकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याने टँकर वाढेफाटÎावर हॉटेल मानसजवळ थांबवला. यावेळी टँकरमधून मोठÎा प्रमाणात आवाज येऊ लागल्याने ड्रायव्हर घाबरला. खाली उतरून पाहिले असता टँकरच्या पाठीमागून ऑक्सिजन गळती सुरू झाली होती. मात्र गळतीचे प्रमाण वाढतच चालल्याने पांढऱया रंगाचा धूरसदृश्य ऑक्सिजन बाहेर पडत होता. या टँकरमध्ये 18 ऑक्सिजन होता.
ही बाब सातारा पोलिसांना कळताच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांसह फौजफाटा महामार्गावर गेला. त्यांनी तातडीने आजूबाजूची वाहतूक इतर दिशांना वळवून टाकली. तोपर्यंत चालकाने गळतीबाबत पुरवठा कंपनीच्या टेक्निशियनकडून मार्गदर्शन घेतले. टँकर ओव्हरलोड असल्याने हा प्रकार घडला असल्याचे समोर येत असून दीड, दोन तासांच्या या प्रकारानंतर गळती थांबल्यानंतर हा ऑक्सिजन टँकर कोल्हापूरकडे रवाना केल्यानंतर पोलीस दलासह टँकर चालकाने देखील सुटकेचा निश्वास टाकला. टँकर ओव्हरफ्लो झाला असल्याने गळती लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.