सातारा / प्रतिनिधी
गेल्या कित्येक दिवसापासून सातारा शहरात रविवार पेठ कासट मार्केट परिसरात नेत्यांच्या नावाचा वापर करून एका फाळकूट भाईने दारूच्या गुत्याचा चांगलाच जम बसवला आहे. अगदी तयार केल्या गणेश मंदिराच्या समोरच रिकाम्या दारूच्या बाटल्याचा खच लावतो. लहान मुलांना दारूच्या बाटल्या विकायला भाग पाडतो. त्याचे कारनामे अनेक आहेत. नेमके लॉकडाऊनच्या दिवशीच दारूच्या बाटल्या आणल्याची सातारा शहर पोलिसांना खबर लागली. पोलिसांनी फाळकूट भाईच्या गुत्यावर शनिवारी दुपारी छापा मारला. पोलिसांना बघताच त्या गुतेदाराच्या महिलांची चांगलीच पळताभुई झाली. मात्र, दोन्ही गुतेदार अगोदरच गायब झाले होते. सातारा शहर पोलीस दारूविक्री करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरत आहेत. तानाजी बडेकर आणि अजय घाडगे या दोघांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या गुत्यावरून 50 हजार रुपयांची दारू हस्तगत केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवार पेठेत कासट मार्केट या परिसरात गेल्या काही वर्षात एक फाळकूट भाई नेत्यांच्या नावाने दोन नंबरचे धंदे करून मनी गोळा करतो. त्याचाच जोडीदार तानाजी बडेकर हा धटिंगगिरी करून त्यास साथ देतो. दारूचा बेकायदा साठा व विक्री येथे दररोज केली जाते. लहान मुलांना वडापावला पैसे देऊन दारूच्या बाटल्या विकण्याचा येथे प्रकार होतो. टाकलेल्या टपऱ्या काढू नयेत म्हणून गणपती मंदिर उभे केले असून त्याचे पावित्र्य जोपासले जात नाही.त्या मंदिराच्या बाजूला रिकाम्या बाटल्या ठेवल्या जातात.
सध्या लॉकडाऊन सातारा शहरात सुरू आहे. त्यामुळे ह्या फळकूट भाईच्या गुत्यावर दोन दिवस अगोदर रात्रीची दारू आणून ठेवली. याची माहिती सातारा शहर पोलिसांना लागली. दरम्यान, सह पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेल्या सूचनेनुसार व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनानुसार दि.18रोजी दुपारी छापा टाकला. दोन ठिकाणी ठेवलेल्या 50 हजार रुपयांचा दारूचा साठा हस्तगत केला.गुत्यावर छापा पडल्याची माहिती मिळताच तानाजी बडेकर आणि अजय घाडगे हे दोघे अगोदरच पसार झाले.
आहेत.
त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते दोघे कुठे असतील तेथून त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
या कारवाईत सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख व पो.नि.आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांचे पथकातील पो.हवा.प्रशांत शेवाळे ,पो.ना.शिवाजी भिसे,पोना,अविनाश चव्हाण,पो.कॉ.अभय साबळे,किशोर तारळकर,विशाल धुमाळ,गणेश घाडगे,संतोष कचरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला
Previous Articleरोटे. शरद पै यांचा विशेष पुरस्काराने गौरव
Next Article कबनूरात आणखी चार पॉझिटिव्ह एकूण बाधित संख्या पंधरावर








