प्रतिनिधी / सातारा
आज संपूर्ण देश कोरोना सारख्या महाभयंकार रोगाचा सामना करत आहे.व आज मोठ्या शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. त्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. तरीपण सामाजिक भान ठेवून आज प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. आपण सुद्धा आपल्या परीने हातभार लावला पाहिजे हे ओळखून शिवाजी विद्यालय मसूरची सन.1985 ची 10 वी बॅच मसूर चे माजी सरपंच प्रकाश माळी, राजेश शहा, गणेश जाधव, किशोर दीक्षित, विश्वास भोज, विजय पाटील यांच्या पुढाकाराने सर्व मित्र-मैत्रिणी यांनी एकत्र येऊन मसूर ग्रामपंचायतीस ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिले.
तसेच मसूरचे रहिवासी शशांक शेंडे यांनीही ग्रामपंचायतीस ऑक्सिजन मशीन दिले. या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ क्रीडा समितीचे सभापती मा. मानसिंगराव जगदाळे साहेब उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय गोरड, मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, मसूरचे उपसरपंच विजयसिंह जगदाळे, मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी शिवडे येथे पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोडा प्रकरणातील आरोपींचा चोवीस तासाच्या आत छडा लावून त्यांना जेरबंद केल्यामुळे त्यांचा सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी मानसिंगराव जगदाळे साहेब युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.