प्रतिनिधी / सातारा
राज्यशासनाने बुधवारी आणि गुरुवारी रात्री उशिरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. काल सायंकाळी उशिरा कोल्हापूर परिक्षेत्रातील बदल्याचे गॅझेट पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी जाहीर केले. या गॅझेटमध्ये सातारा पोलीस दलात मोठा बदल झाला आहे. जिल्ह्याला दोन पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहा पोलीस उपनिरीक्षक मिळाले आहेत. तर जिल्ह्यातील एक पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक बदलून गेले आहेत.
सातारा जिल्ह्यात पुणे ग्रामीणवरून पोलीस निरीक्षक सुरेश बोडके, कोल्हापूरवरून संजय पतंगे आले आहेत. जिल्ह्याला चार सहाय्यक पोलीस निरीक्षक मिळाले असून जिल्ह्यातून तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. एकास मुदत वाढ मिळाली आहे. जिल्ह्यात नवे दहा पोलीस उपनिरीक्षक आले असून चौघांना जिल्ह्यात मुदतवाढ मिळाली आहे. तर जिल्ह्यातून चार पोलीस उपनिरीक्षक बदलून गेले आहेत.
बदलून आलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख (वडूज)मुदतवाढ, आरती नांद्रेकर(कोल्हापूर), संतोष पवार(कोल्हापूर), नवनाथ गायकवाड(सोलापूर ग्रामीण), रवींद्र तेलतुंबडे(सोलापूर ग्रामीण) तर साताऱ्यातून बाहेर गेलेले श्याम बुवा(सोलापूर ग्रामीण), विकास बडवे (कोल्हापूर), महेश भावीकट्टी (सोलापूर ग्रामीण) यांच्या बदल्या झाल्या आहेत.
बदलून आलेल्या पोलीस उपनिरीक्षकांची नावे
अनंत खाडे(सांगली), इसाक चौगुले(सांगली), प्रकाश उमप, अन्वर मुजावर(दोघेही सोलापूर ग्रामीण), संतोष रोकडे, रवींद्र शिंदे, सुनील पवार, अनिल चौधरी, विजय चव्हाण(सर्व कोल्हापूर), सदाशिव स्वामी (सांगली),तर सातारा जिल्ह्यातून अनिल शिरोळे यांची कोल्हापूरला, राजेंद्र यादव, शिवराम खाडे यांची पुणे ग्रामीण, शिरीष शिंदे यांची सांगलीला बदली झाली आहे.
पुन्हा एलसीबीला नाही वाली
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा उजवा हात समजला जातो. या कार्यालयाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे, पद्माकर घनवट यांच्या कार्यकाळात डिटेक्शनचे प्रमाण मोठे होते. पथक तात्काळ गुन्ह्याच्या ठिकाणी पोहचून आरोपींना जेरबंद करायचे.पण त्यांच्यानंतर या पदावर कार्यरत व्हायला कोणी तयार नव्हते. सोलापूर ग्रामीणवरून दीड वर्षांपूर्वी आलेल्या सर्जेराव पाटील यांनी सुरुवातीला नकार दिला होता. पुन्हा त्यांनी पदभार स्वीकारला अन कामाला सुरुवात केली. त्यांचे ही काम चांगले होते. त्यांनी पुन्हा विनंती बदली सोलापूरला करून घेतली आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणला तत्कालीन सातारा जिल्ह्यात कार्यरत असलेले दयानंद ढोमे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे.









