प्रतिनिधी/खंडाळा
गत दोन दिवस तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून खरीपाच्या पिकांना आधार मिळाला आहे. दरम्यान,पश्चिम भागात ‘ भात ‘ पिकांच्या लागवडीस वेग येणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.
तालुक्यात खंडाळ्यासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे भाताची रोपे सुकू लागल्याचे चित्र होते. सुमारे 35 टक्के भाताची लागवड झाली असली तरी पावसाअभावी भात पिकाची लागवड होणार की नाही,अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. तर पश्चिम भागात रखडलेल्या भात पिकाच्या लागवडीला गती येणार असून खरीपातील पिकांना आधार मिळाल्याने बळीराजा समाधानी असल्याचे दिसून येते.
मंगळवारपासून सुरु झालेल्या पावसामुळे बाजरी,भात,कडधान्य आदी पिकांना संजीवनी मिळाली आहे. या भिज पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असुन पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवीली जात आहे. बुधवारी सकाळ पर्यत खंडाळ्यात -6.4 मि.मी, शिरवळ – 30.2 मि.मी, लोणंद – 7 मि.मी, वाठार ब्रु॥- 3 मि.मी मिळून 46.6 मि.मी एवढी पावसाची नोंद झाली आहे.
Previous Articleगगनबावडा तालुक्यात आढळले 12 कोरोना बाधित
Next Article सातारा जिल्ह्यात 62 जण कोरोनामुक्त दोघांचा मृत्यू








