प्रतिनिधी/सातारा
जिल्ह्यातील पश्चिम भागातल्या धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. संततधार सुरू असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 42.78 मि.मी. पाऊस झाला आहे. कोयना धरणातून एकवीसशे क्यूसेक्स पाणी नदी पात्रात तर वीर धरणातून 22हजार 860 क्यूसेस सकाळी 9.00 वाजता नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. उरमोडी नदीत 2600 क्यूसेक्श पाणी सोडण्यात आले आहे.
गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 42.78 मि.मी.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.
सातारा 72.53 (600.67) मि. मी., जावली – 70.18 (1005.56) मि.मी. पाटण – 46.00 (937.63) मि.मी. कराड – 23.38 (429.07) मि.मी., कोरेगाव – 33.33 (392.83) मि.मी. खटाव – 29.66 (340.06) मि.मी. माण – 13.57 (291.57) मि.मी., फलटण – 10.44 (280.62) मि.मी. खंडाळा – 20.54 (340.70) मि.मी. वाई – 32.29 (532.97) मि.मी. महाबळेश्वर – 181.93 (3437.18) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 8588.87 मि.मी. तर सरासरी. 780.81 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी
कोयना धरणात आज 77.26 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 77.17 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 112 नवजा येथे 122 व महाबळेश्वर येथे 177 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 7.92 (67.78), धोम -बलकवडी- 3.52 (88.78), कण्हेर – 7.85 (81.85), उरमोडी – 8.92 (92.41), तारळी- 4.60 (78.74), निरा-देवघर 7.25 (61.83), भाटघर- 17.40 (74.03), वीर – 9.20 (97.85).
उरमोडी धरणातून पाणी सोडले
उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि. १३ पासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सध्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे आज दि. १४ रोजी सकाळी १० वाजता जलाशय परिचालन सूचिनूसार धरणाचे वक्रद्वारामधून 2600 व विद्युत गृहातून 400 क्यूसेक्स एवढा विसर्ग उरमोडी नदीत सोडण्यात येणार आहे तरी धरणाच्या खालील बाजूचे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी, असे आवाहन कृष्णा सिंचन विभाग, सातारा कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
नीरा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा
सध्या वीर धरणातुन सोडण्यात येणा-या विसर्ग कमी करुन तो 22हजार860 क्यूसेकस सकाळी 9 वाजता करण्यात आला आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा वीर धरण विभागाने दिला आहे.
कोयना धरण
■ पाणी पातळी:2144′ 03″
■ सध्याचा पाणीसाठा 82.75 tmc
■सध्याची आवक 41389 cusecs
■सकाळी 11 वाजता धरण पायथा विजगृहातून 2100 cusecs विसर्ग सुरू करण्यात येत आहे
■ दुपारी 2.00 वाजता रेडियल 9 इंच उचलण्यात येत आहेत. करण्यात येत आहेत. त्यावेळी एकूण विसर्ग 2100 cusecs वरून 5800 cusecs असेल.









