पालिकेच्या अतिक्रमण विभागाला जाग येणार कधी ?
प्रतिनिधी / सातारा
सातारा पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग तसा तत्परनेते काम करतो. मात्र, त्या विभागाला व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील जाळ्य़ा दिसत नाहीत. व्यापाऱयांनी आपल्या दुकानासमोर पार्किंगमध्ये लोखंडी जाळ्य़ा लावल्या आहेत. त्यामुळे दुचाकी चालकांना वाहने लावण्यास जागाच शिल्लक नाही. त्याबाबत साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सातारा शहरात दुकानाबाहेर फुटपाथवर जाळ्या लावण्याची परंपरा आहे. याकडे पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असते. सातारा पालिकेकडून यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. सातारा शहरात रहदारीचा परिसर म्हणून मोती चौक ते सदाशिव पेठ पाचशे एक पाटीपर्यंत आहे.
या परिसरात व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर पार्किंग ज्या बाजूला असेल त्या दिवशी लोखंडी जाळय़ा असतात. त्यामुळे दुकानांमध्येच येणाऱ्या नागरिकांना आपले वाहन उभे करण्याकरिता समस्या निर्माण होते. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. पालिकेने ठोसपणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होवू लागली आहे.