प्रतिनिधी / सातारा
सातारा बस स्थानक ते सेव्हन स्टार इमारत या दरम्यान झालेल्या अतिक्रमण हटवण्याची कारवाई आज दुपारी करण्यात आली. गेले कीत्येक दिवस हा प्रश्न रेंगाळत होता तो या कारवाईने सुटणार असल्याचं चित्र काहीसं तयार होत आहे. ही कारवाई मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने केली.