ऑनलाईन टीम / सातारा :
पाचगणी ता. महाबळेश्वर येथे एका भरधाव वेगातील रुग्णवाहिकेने चार वाहनांना जोरदार धडक दिली. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पाचगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथे एका कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतदेह घेऊन ही रुग्णवाहिका वाईमार्गे पाचगणीत आली होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या रुग्णवाहिकेने पाचगणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेत वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.









