प्रतिनिधी / सातारा
संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक झाल्याने जिल्ह्यात पर्यटकांची महाबळेश्वर, पाचगणीकडे शनिवारी, रविवारी मोठी गर्दी होऊ लागली आहे. शनिवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पसरणी घाटात कठडा तोडून गाडीचा अपघात झाला.
सूरूर- पोलादपूर राज्य महामार्गावर पसरणी घाटात वाईच्या दिशेने जाणारी एक गाडी सकाळी साडेअकराच्या सुमारास बूवासाहेब मंदिराजवळील खोल दरीत कोसळली. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. या अपघातात एक ठार, दोन जखमी झाल्याचे समजते. वाई पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य चालू आहे.









