महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये होणार फाईट, मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेळ कमी, मतपत्रिका असल्याने मतदारांना पटवून सांगावे लागतेय
सातारा / प्रतिनिधी
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूकिसाठी दि.1 डिसेंबरला होत असून ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे.सातारा जिल्ह्यातून हौशे आणि गवशे इच्छुक आळींबीप्रमाणे दिसू लागले आहेत.मात्र या निवडणूकीमुळे मतदारांची दिवाळी होणार आहे.महाविकास आघाडीचे पुणे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड हे असण्याची शक्यता आहे तर भाजपकडून अजून ही उमेदवार कोण आहे हे निश्चित झाले नाही.मतपत्रिका असल्याने मतदारांना मतदान कसे करावे हे पटवून देताना कार्यकर्त्यांना नाकी नऊ येत आहे.
सातारा जिल्ह्यातून यापूर्वी पदवीधरसाठी भाजपचे उमेदवार म्हणून चंद्रकांतदादा यांना मतदान चांगले होत होते.गत निवडणुकीला सारंग पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात काटे की लढत झाली होती.चंद्रकांत पाटील हे 3 हजार 522 मतांनी निवडून आले होते.त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी विधान सभेच्या निवडणूक लढवली.त्यामुळे पुणे पदवीधरची निवडणूक लागली.त्याच बरोबर शिक्षकची निवडणूक लागली आहे.पुणे पदवीधरसाठी सातारा जिल्ह्यात जावलीतून 1 हजार 111,कराडमधून 14 हजार413, खंडाळामधून 2 हजार 146, खटावमधून 3 हजार 291, कोरेगाव मधून 3 हजार 710, महाबळेश्वर मधून 496, माण मधून 3 हजार 261, पाटण मधून 3 हजार954, फलटणमधून 10 हजार 936, वाईमधून 2 हजार 594 असे जिल्ह्यातून53 हजार 218 मतदार दि.4 नोव्हेंबर 2020 पर्यंत होते. तर शिक्षक मतदार जावलीतून 124, कराड मधून 1 हजार 833, खंडाळातून 404, खटावमधून 569, कोरेगाव मधून 640, महाबळेश्वरमधून 95, माण मधून 503, पाटण मधून 494, फलटणमधून 771, सातारा 1824, वाई 361 असे जिल्ह्यातून 7 हजार 618 मतदार आहेत.
कोरोनामुळे अगोदर घरी असलेल्या मतदारांनी आपली नोंदणी करून घेतली.आता दिवाळीच्या सणाच्या तोंडावर आचारसंहिता जारी करण्यात आली असून मतदार जरी सुशिक्षित असला तरीही मत पत्रिका असल्याने त्यातच दिवाळीचा सण कितीही सुशिक्षित मतदार असला तरीही या निवडणूकित प्रथमच घोडे बाजार होण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडी आणि भाजप या दोघामध्ये लढत होणार असून अनेक उमेदवार हे काही हाताला लागते का यासाठी निवडणुक लढवत आहेत.विशेष म्हणजे शिक्षक मतदार संघाची निवडणूकित उमेदवार हा शिक्षक चालत नाही, इतर कोणीही चालतो त्यामुळे तेथे महाविकास आघाडीकडुन कोणाला संधी दिली जाणार याकडे नजरा आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यात जोर बैठका सुरू आहेत.राष्ट्रवादीकडून जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, गोरखनाथ नलावडे, विध्यार्थीचे अतुल शिंदे हे ठिकठिकाणी बैठका घेत आहेत.मतदारांना मोबाईलवर मेजेस पाठवले जात आहेत.भाजपकडून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विजय काटवटे यांच्याकडून बैठका सुरू आहेत.त्यामुळेच महाविकास आघाडीकडून पुणे पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांच्या नावाची शक्यता वर्तवली जात आहे.भाजपकडून अजून नाव निश्चित झाले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
Previous Articleचित्रकार बळवंत लिमये यांचे निधन
Next Article कोल्हापूर : कुंभार समाज मोर्चासाठी दिवाळीनंतर बैठका









