सातारा / प्रतिनिधी :
ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शेवटच्या टप्यात असताना सातारा तालुक्यातील नेले येथे एका पॅनलकडून मतदारांना चिकन, मटण वाटप सुरू असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शिवराम साबळे यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर अनिकेत राजेंद्र पिसाळ, अशोक सुधाकर जाधव (दोघे, रा.नेले ता.सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार पाटोळे तपास करत आहेत.









