सातारा शहरात एका संघटनेच्या पुढाऱ्याच्या अफलातून योजनेची चर्चा
पालिका प्रशासन घालतेय पाठीशी, कोणत्या नगरसेवकांची मेहरबानी
प्रतिनिधी / सातारा
शहरात अतिक्रमण वाढली आहेत. ही अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने वारंवार कारवाई केली तरी दुसऱ्या दिवशी लगेच आहे तसे वातावरण दिसते. आता तर चक्क एका संघटनेच्या नेत्याने राधिका चौक ते एस. टी. स्टॅण्ड रोडवर टपरी टाकायची असेल तर ४० हजार द्या, अशी अफलातून योजना सूरु केल्याची चर्चा आहे. त्या नेत्याला कोणत्या नगरसेवकांची मेहरबानी आहे. अतिक्रमण विभाग कधी हटवणार या टपऱ्या असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरातले अरुंद रस्ते मुळात अतिक्रमण केल्याने बजबजपुरी झाले आहे. नेत्याच्या नावाने दिसली मोकळी जागा की अतिक्रमण टाकण्यात येते. पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग हा वारंवार कारवाई करतो. कारवाई करून गेल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी होते तसे चित्र पहायला मिळते. सातारा शहरात तर आता लॉकडाऊननंतर राधिका चौक ते एस. टी. स्टॅण्ड रोडवर नव्याने टपऱ्या पडू लागल्या आहेत. +त्या टपऱ्या टाकण्यासाठी एका संघटनेच्या नेत्याने टपरी टाकायचा दर ४० हजार रुपये फक्त दर काढला आहे, याची जोरदार चर्चा सूरु आहे.पालिकेकडून अशी कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोणाची कृपा त्यांच्यावर
शहरात अतिक्रमण बोकाळली असताना ही अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका अतिक्रमण विभागावर काही मंडळी दबाव आणत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.अतिक्रमण वाढविण्यासाठी कोणाची कृपा आहे?, अशी ही उलटसुलट चर्चा सुरू आहे.









