● सकाळी 28 तर रात्रीच्या अहवालात 19 बाधित
● कोरोनाचा वेग पुन्हा वाढला
● कराड, मलकापूर शहरात शिरकाव
● कोरोना बाधित संख्या हजारा कडे
●सलून, पार्लर ला सशर्त परवानगी
प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्ह्यासाठी शनिवारचा दिवस हडकंप माजवणारा ठरला. दिवसभरात एकूण 47 कोरोना बाधित आढळल्याने सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वेग पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. बाधित होणाऱ्यामध्ये पुणे मुंबईचे कनेक्शन जास्त प्रमाणात दिसत आहे. यातूनच कोरोना मुक्त झालेल्या जिल्ह्यातील कराड व मलकापूर या दोन्ही शहरातही कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील सलून ब्युटी पार्लर व्यवसाय बंद होता. हा व्यवसाय काही अटी व शर्तीच्या आधारे पुन्हा सुरू करण्यास जिल्हाधिकार्यानी परवानगी दिली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्याच्या एकूण बधितांचा आकडा 1 हजार कडे वाटचाल करू लागला आहे.
शनिवारी सकाळी आलेल्या अहवालात 28 रुग्णांमध्ये 21 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून यात मुंबई, ठाणे, शाहजहा येथून प्रवास करुन आलेले 6 प्रवासी, 18 निकटसहवासित आणि 4 सारीचे रुग्ण आहेत. तर रात्री पुन्हा 19 बाधित आले.
*बाधितांची तालुकानिहाय आकडेवारी*
*वाई तालुक्यातील(4)* कडेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, बावधन येथील 57 वर्षीय पुरुष.,
*खटाव तालुक्यातील(1)* मायणी येथील 29 वर्षीय पुरुष.,
*सातारा तालुक्यातील(3)* धावली(रोहोट) येथील 45 वर्षीय महिला, राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष.,
*खंडाळा तालुक्यातील(2)* शिंदे वस्ती (लोणंद) येथील 38 वर्षीय महिला, आसवली येथील 27 वर्षीय पुरुष.,
*पाटण तालुक्यातील(1)* उरुल येथील 60 वर्षीय पुरुष.,
*कराड तालुक्यातील(13)* तारुख येथील वय 21, 22 वर्षीय युवक तसेच वय 27, 28 व 48 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 50 वर्षीय महिला, चरेगाव येथील 4 वर्षीय बालक, वय 38 व 36 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील 75 वर्षीय पुरुष.,
*कोरेगाव तालुक्यातील (1)* नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष.,
*जावळी तालुक्यातील (3)* रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, आखेगनी (रांजणी) येथील 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
*रात्री आलेल्या अहवालात 19 जण बाधित*
रात्री आलेल्या अहवालात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण संख्या 47 इतकी झाली.
या कोरोनाबाधित 19 रुग्णांमध्ये 13 पुरुष व 6 महिलांचा समावेश असून यात मुंबई येथून प्रवास करुन आलेले 12 प्रवासी, 7 निकटसहवासित आहेत.
बाधित रुग्णांमध्ये
*कराड तालुक्यातील* जखीणवाडी येथील 47 वर्षीय महिला,23 वर्षीय युवती, 52 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक, लटकेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक आणि 42 वर्षीय महिला व 21 वर्षीय युवती, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, खंडोबानगर (मलकापूर) येथील 8 वर्षीय बालक, वय 30 व 50 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 30 वर्षीय महिला.,
*पाटण तालुक्यातील* नवसरे येथील 42 वर्षीय पुरुष, गमेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष.,
*खटाव तालुक्यातील* खटाव येथील येथील 62 वर्षीय पुरुष.,
*माण तालुक्यातील* म्हसवड येथील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
*12 नागरिकांना आज डिस्चार्ज*
विविध रुग्णालय व कोरोना केंअर सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनातून बऱ्या झालेल्या 12 जणांना आज 10 दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
डिस्चार्ज दिलेल्यांमध्ये *वाई तालुक्यातील* सह्याद्रीनगर येथील 9 वर्षीय बालिका.,
*खटाव तालुक्यातील* शिरसवाडी येथील 4 वर्षीय बालिका व 32 वर्षीय महिला.,
*माण तालुक्यातील* वय 17 व 21 वर्षीय युवक व 39 वर्षीय पुरुष.,
*महाबळेश्वर तालुक्यातील* हरचंदी येथील 63 वर्षीय पुरुष.,
*सातारा तालुक्यातील* गोजेगाव येथील 46 वर्षीय महिला.,
*पाटण तालुक्यातील* शिराळ येथील 70 वर्षीय पुरुष,
*कराड तालुक्यातील* तुळसण येथील 25 महिला व 28 वर्षीय पुरुष, व 5 वर्षीय बालिकेचा समावेश आहे.
*218 नागरिकांच्या घशातील नमुने तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 50, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 45, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 39, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 34, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 21, कोरोना केअर सेंटर शिरवळ येथील 10, रायगाव येथील 13, मायणी येथील 6 एकूण 218 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
*सातारा जिल्ह्यातील सलून्स, ब्युटी पार्लर दुकाने अटी व शर्तींवर सुरु होणार*
राज्य शासनाच्या आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व केशकर्तनालय/सलून दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा यांना सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. नाभिक दुकाने व ब्युटीपार्लरमध्ये सेवा देणाऱ्या ग्राहकाला सेवा देताना मास्क लावता येत नसल्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता टाळण्यासाठी काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक आदेश जारी करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
•या आदेशान्वये फक्त केशकर्तन करणे, केसांना डाय करणे, वॅक्सींग, थ्रेडींग इ. साठीच परवानगी राहील. तथापि त्वचेशी निगडीत सर्व प्रकारच्या सेवांना परवानगी राहणार नाही.
•केशकर्तनालयामध्ये व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी रजिस्टर ठेवावे. या रजिस्टरमध्ये क्रमाक्रमाने येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी. त्याचप्रमाणे दुकानदाराने त्यांना संभाव्य वेळेची सूचना देवून त्याचवेळी पुन्हा येण्याची विनंती करावी. केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये या नोंदीच्या क्रमाने ग्राहकांना सेवा द्यावी. प्रथम ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा. केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर दुकानामध्ये कारागीर व ज्या व्यक्तीचे केशकर्तन करावयाची आहे अशी एकच व्यक्ती दुकानामध्ये असतील. उर्वरित लोक दुकानाबाहेर थांबतील. मोठ्या सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्चीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर ठेवून अतिरिक्त कारागीराला काम करता येईल.
•सेवा घेणारी व्यक्ती ही मास्क लावू शकत नाही त्यामुळे केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या व्यक्ती व कारागिरांनी चेहऱ्यावर मास्क लावून त्यावर फेसशिल्ड कायमस्वरुपी घालणे बंधनकारक आहे. तसेच हातामध्ये ग्लोज घालणे व ॲप्रण घालणे बंधनकारक राहील.
• सलून दुकानामध्ये किंवा ब्युटी पार्लरमध्ये एका ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे (उदा. खुर्ची व इतर अनुषंगिक साहित्य) निर्जंतुकीकरण करणे बंधनकार राहील.
•एका ग्राहकाला वापरेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरू नये. यासाठी एकदा वापरुन झाल्यावर विल्हेवाट लावता येईल असे टॉवेल किंवा नॅपकिन इ. ची उपलब्धता करुन वापर करावा. त्यासाठी ग्राहकांच्या संख्येइतके टॉवेल व कापडाची उपलब्धता दुकानदाराने करुन ठेवावी.
सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतुकीकरण करावे.
•दुकानामध्ये येणाऱ्या लोकांनी, दुकानाबाहेरील लोकांनी सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक राहील.
•दुकानातील भूपृष्ठभागाचे दर 2 तासांनी सॅनिटाईज करणे बंधनकारक राहील.
*सुरक्षा आदेशाचे उल्लंघन केल्यास पाचशे पासून 2 हजारापर्यंत दंड*
दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास संबंधित दुकानधारकावर कडक कारवाई करण्यात येईल. दुकानामध्ये काम करणाऱ्या कारागीराने चेहऱ्यावर मास्क परिधान न केल्यास संबधित व्यक्तीवर रु. 500/- दंड आकारण्यात येईल तसेच दुकानामध्ये एका खुर्चीसाठी एका ग्राहकापेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल.
या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/- दंड आकारण्याता येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी.
*जिल्ह्यात शनिवारी*
एकूण बाधित 47
एकूण मुक्त 12
एकूण निगेटिव्ह 185
बळी. 00
*जिल्ह्यात शनिवारपर्यंत*
एकूण बाधित 938
एकूण मुक्त 711
एकूण बळी 42
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








