प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हावासियांना आरोग्य सुविधा देण्यासाठी जंबो हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याचे कळते.हे हॉस्पिटल सुरू करण्यापेक्षा आहे त्या रुग्णालयात रुग्णांना सुविधा द्या.ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात बेड उपलब्ध करा, कोरोना बाधित मुक्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल, अशी मागणी भाजपचे महारास्ट्र प्रदेश कार्यसमितीचे सदस्य अॅड.भरत पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अॅड.भरत पाटील म्हणाले, सातारा जिल्हात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुण वाढत आहेत. त्यामधे रुग्णबरे होण्याचे प्रमाण ही चांगले आहे. परंतू प्रत्येक मृत्यू हा मृत्यूच असतो. आज आपली आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. काही खाजगी हॉस्पिटल आपण घेत आहोत. ती ही अपुरी आहेत. अपूरी पडणारी व्यवस्था आणि शासनाच्या सध्या उपलब्ध असलेल्या मुलभुत बिल्डींग, प्रशस्थ रूम्स, कॉटस आहेत. या सुविधाचा योग्य वापर केलेने शासनास मोठी आर्थिक व्यवस्था ही करावी लागणार नाही. फक्त ऑक्सिजन सिलेंन्डरचा पुरवठा करावा लागेल.
आज सातारा जिल्हात ग्रामीण भागात 30 हजार व डोंगरी भागात 20हजार लोकसंख्ये साठी 1 याप्रमाणे 71 प्राथमिक आरोग्य केंद्र,5 हजार लोकसंख्येसाठी 1या प्रमाणे 400 उपकेंद्र त्याच बरोबर 17 आयुर्वेदीक दवाखाने, जिल्हात 17 ग्रामीण, कुटिर रुणालय व 1 जिल्हा समान्य रुणालय 2 उपजिल्हा रुणालय हे प्रशिक्षित डॉक्टरस, नर्सेस, फर्मासीस्ट, आरोग्य सेवक,पारामेडीकल स्टाप शिवाय आशा हेल्थ वर्कर्स हे उपलब्ध आहेत.आपण 17 ग्रामीण रुणालय मधे 17×40 =680, प्राथमिक आरोग्य केंद्र71 , 71×20=1420, उपकेंद्र 400×5=2000, आयुर्वेदीक दवाखाने 17 , 17×10=170 तसेच दोन जिल्हा उप रुणालय कराड व फलटण येथे प्रतेकी 50 प्रमाणे 2×50=100 सिव्हिल हॉस्पिटल येथे अती तातडीच्या रुणासाठी राखीव केले तरी ही आपण 4 हजार370 रुणाची व्यवस्था ही विशेष खर्च न करता व रुणाना त्यांच्या राहत्या घरापासून जवळ सोय होवु शकते.
त्यामूळे त्यांचे मानसिक आरोग्य ही ऊतम राहिल.यामुळे शासकीय यंत्रणे वर विशेषत: आपण व जिल्हाशल्यचिकित्सक यांचे वरील कामाचा ताण कमी होईल व कामाच वितरण केलेने जिल्हा आरोग्य आधिकारी, तालुक आरोग्य आधिकारी यांची ही जबाबदारी निश्चित होईल व रुणाना चांगली सेवा मिळेल व सर्व आरोग्य केंद्र ही कायम स्वरुपासाठी आरोग्य सेवे साठी सक्षम होतील, अशी मागणी करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









