इच्छुकांनी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी / सातारा
ग्रामीण रुग्णालय, मेढा या ठिकाणी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका 102 या वाहनाकरिता जे वाहनचालक कंत्राटी पद्धतीने वाहन चालक म्हणून काम करण्यास इच्छुक आहेत, अशा वाहनचालकांनी त्यांच्या बायोडेटा सादर करुन मुलाखतीकरीता वैद्यकीय अधिक्षक वर्ग -1 ग्रामीण रुग्णालय, मेढा या ठिकाणी समक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालय मेढा येथील डॉ. चंद्रकांत यादव यांनी केले आहे. या बाबतच्या अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा.









