प्रतिनिधी/सातारा
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरोनाबाधित रुग्णांचा निकट सहवासित असलेल्या 17 वर्षीय युवकास या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र काल, शनिवारी त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना पुर्नतपासणीसाठी बी.जे. वैद्यकीय महविद्यालय पुणे येथे पाठविण्यात आला होता. या तपासणीत या युवकांचा अहवाल कोरोना (कोव्हीड19) बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तर आज कराड येथेही दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी आतापर्यंत जिल्ह्यातील तिघे कोरोना बाधित रुग्ण पुर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.








