प्रतिनिधी / महाबळेश्वर
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या नियमांचे उल्लंघन करणे येथिल एका हॉटेल मालकास चांगलेच महागात पडले आहे. नियम मोडल्याने महाबळेश्वर पोलिसांनी केला हॉटेल मालकास 25 हजार तर समारंभ आयोजकास 10 हजारांचा दंड कोरोनाची लस आल्याने सर्वत्र बेफिकीरी वाढली आहे. लोकांनी कोरोनाची चिंता करणे सोडुन दिले आहे. अशा बेजबाबदार लोकांमुळे पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढल्याने प्रशासनाची चिंता वाढु लागली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांनी नविन नियमावली जाहीर केली आहे. या नविन नियमांवली नुसार लग्न समारंभास सर्व मिळुन 50 लोकांची मर्यादा घातली आहे. या नियमांचे उल्लंघन करणारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सक्त सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. असे असले तरी काही लोकांना मात्र हे नियम पाळावे वाटत नाही त्या मुळे प्रशासनाला कारवाई करणे भाग पडते दोन दिवसांपुर्वी बस स्थानका मागे असलेल्या हॉटेल ड्रीमलॅण्डमध्ये एका धनिक कुटूंबातील लग्न सोहळा होता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमापेक्षा अधिक लोक लग्न समारंभास हजर होती.
लग्नाला झालेल्या गर्दीची खबर महाबळेश्वर पोलिसांनी मिळाली असता त्यांनी पथक पाठवुन या गर्दीची खात्री केली असता हॉटेल मधील लग्नाला नियमापेक्षा अधिक गर्दी झाली होती. पोलिसांनी नियम मोडल्याबद्द्ल हॉटेल ड्रीमलॅण्डच्या मालकास जागेवर 25 हजारांचा दंड ठोठावला त्याच प्रमाणे लग्न आयोजकास दहा हजारांचा दंड ही पोलिसांनी ठोठावुन वसुल केला. महाबळेश्वर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे शहरातुन कौतुक केले जात आहे. तर ज्या ज्या हॉटेलमध्ये अशा प्रकारचे लग्न समारंभ होतात, त्या हॉटेल व्यवसायिकांनी पोलिस कारवाईची धास्ती घेतली आहे.









