4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कुडाळ : संपूर्ण जावळी तालुका दारूबंदी असताना मेढा- कुडाळ रोडवर सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी धाड टाकत दारु अड्डा उध्वस्त केला. देशी दारू आणि विदेशी दारूच्या बाटल्या जमिनीवर फेकत संबंधित दारू विक्रेत्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्रवीण रामचंद्र वारागडे असे या दारूविक्रेत्याचे नाव आहे.
जावळी मध्ये गेल्या अनेक वर्षापासून अधिकृत दारू दुकाने महिलांनी मतदानाद्वारे बंद केली होती. त्यानंतर कुडाळ परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा सुळसुळाट झाला होता पोलिसांच्या वरद हस्ताने अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच यावर कोणाचेच अंकुश नव्हते वारंवार तक्रारी करून देखील यावर कोणीच कारवाई करायला तयार नव्हते. मात्र, स्वतः आज पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी अधिकृतरित्या थेट दारू अड्ड्यावर धाड टाकली व दारू अड्यावरील विकत असणाऱ्या सर्व देशी-विदेशी बाटल्या बॉक्स स्वतःच्या हाताने बाहेर फेकून दिले.